शिंदखेडा तालुका उपाध्यक्ष हिरालाल कोळी यांचे आमदार यांना पत्र !
मालपूर (गोपाल कोळी) आदीवासी टोकरे, ढोर कोळ्यांना एसटीचे दाखले मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत लागत आहे. तसेच येत्या काही दिवसात जमातीचे कोणतेही ठोस कामे केले नाहीत, तर आमचा रोष मतदार पेटीतून तुम्हाला नक्किच दाखवू, असा इशारा एका पत्राद्वारे शिंदखेडा तालुका उपाध्यक्ष हिरालाल कोळी यांनी शिंदखेडा मतदार संघाचे आमदार जयकुमार रावल यांना दिला आहे.
पत्रात म्हटले आहे की, साहेब मी चांदगड-भुरक्षी गावातील ग्रामस्थ हिरालाल कोळी आपणास समस्त चांदगड-भुरक्षी गावातील लोकांच्या वतीने प्रश्न विचारतो की, साहेब आपण15 वर्षापुर्वी संपुर्ण आदीवासी टोकरे कोळींची संख्या असलेले आपल्या मतदार संघातील ऐतिहासिक असुनही शासकीय योजनांपासून दुर्लक्षित असलेले चांदगड-भुरक्षी या आमच्या गावात आपण आले असतांना आपण आम्हाला विश्वासित केले होते की,तुम्ही जर शिंदखेडा तालुक्यात मला निवडून दिले तर तुम्हाला आदीवासी टोकरे कोळी चे दाखले त्वरित मिळण्यासाठी मी जीवतोड प्रयत्न करेल .आम्ही तुम्हाला निवडून दिले… परंतु निवडून आल्यानंतर तुम्ही सांगितले कि मी आदिवासी कोळ्यांच्या जीवावर मोठा झालो आहे राज्यात सत्ता आमची आली तर मी तुमचे काम करू शकतो…त्यानंतर पाच वर्षे तुमचे सरकार होते तरी तुम्ही आमच्या भोळ्याभाबड्या आदिवासी कोळी समाजाला गोड बोलून विश्वास देत राहीले परंतु कोळींना ST चे दाखले सुलभतेने मिळावे यासाठी प्रयत्न करतांना दिसले नाहीत जातीचे दाखले तर दूरच आमच्या जमातीला खावटी योजना, घरकुल योजना मिळावी यासाठी तळमळीने प्रयत्न करीत नाहीत… आज तुम्ही विधानसभेत मराठा तसेच ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी मागणी करतात परंतु तुम्ही तुमच्या शिंदखेडा मतदार संघात ज्या मतदारांच्या जीवावर इतकी वर्ष सत्ता भोगत आहेत आमदार म्हणुन विधानसभेत उभे आहेत त्या आदीवासी टोकरे, ढोर कोळ्यांना एस टी चे दाखले मिळ्ण्यासाठी किती संघर्ष करावा लागत आहे हे तुम्हाला दिसत नाही… लक्षात ठेवा येत्या काही दिवसात तुमच्या मार्फत आमच्या जमातीचे कोणतेही ठोस कामे आपण केले नाहीत तर आम्ही यावेळी आमचा रोष मतदार पेटीतून तुम्हाला नक्किच दाखवू व कोळ्यांची ताकत तुम्हाला जरूर दाखवू, असा इशारा या पत्राद्वारे शिंदखेडा तालुका उपाध्यक्ष हिरालाल कोळी व चांदगड भुरक्षी वाल्या सेना गृपतर्फे देण्यात आला आहे.