बंद केलेली महा ई-सेवा केंद्रे सुरू करा ; केंद्रचालकांची निदर्शने, जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन
धुळे (स्वप्नील मराठे) बंद केलेली महा ई-सेवा केंद्रे पुन्हा सुरू करावीत, अशी मागणी केंद्रचालकांनी केली आहे. याबाबत प्रेरणा फाऊंडेशनच्या नुकतेच नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सर्वसामान्य नागरिकांना विविध दाखले, प्रमाणपत्र सहज उपलब्ध व्हावे यासाठी महा ई-सेवा केंद्रे सुरू केली आहेत. परंतु कोरोना काळात जिल्ह्यात ११० केंद्रे बंद करण्यात आली आहेत. ही केंद्रे चालविणारे जवळपास सर्वचजण सुशिक्षित बेरोजगार आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांची देखील गैरसोय होत आहे. शिवाय सध्या कोरोनाचा संसर्गदेखील कमी झाला आहे. त्यामुळे बंद केलेली ११० केंद्रे त्वरित सुरू करावीत, अशी मागणी फाऊंडेशनचे संचालक रवींद्र दामोदर, जितेंद्र मोरे, बंटी अहिरे, विक्की धिवरे, प्रशांत पाटोळे, अतिख पठाण यांच्यासह महा ई-सेवा केंद्रचालकांनी केली आहे.