नाशकात शास्त्रार्थ सभेत राडा ; महाराजांवर उगारला माईक
नाशिक : नाशिकमध्ये आज हनुमान जन्मभूमीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शास्त्रार्थ सभेत, साधु महंतांमध्येच आसन व्यवस्थेवरुन जोरदार वाद झाला आहे. शिवाय या सभेत महाराजांनी एकमेकांवर माईक देखील उगारला आहे.
हनुमान जन्मस्थळावरुन वाद चिघळल्याचं चित्र दिसून येत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी नाशिकमध्ये शास्त्रार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान महंतांमध्ये वाद झाल्याचाएक व्हिडीओही समोर आला आहे. यात तुलसीदास महाराज समोरच्या महंतांवर माईक उचलून मारताना दिसत आहे. यानंतर समोरचे महंत संतापले आणि उभे राहिले.
हनुमान जन्मभूमीचा वाद सोडवण्यासाठी आज नाशिकमध्ये शास्त्रार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यापूर्वी शास्त्राने उत्तर देण्याचे गोविंदगिरी महाराजांनी आवाहन केलं होतं. त्यानुसार या सभेला देशभरातील विविध धर्मपीठाचे 25 ते 30 प्रतिनिधी उपस्थित आहेत. हनुमानाचे जन्मस्थळ अंजनेरी आहे की, किष्किंदा यावरुन सध्या नाशिकमध्ये महंतांमध्ये वाद सुरू आहे.
किष्किंदाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी जन्मस्थळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हनुमानाच्या जन्मस्थळाचा विषय लावून धरला. यानंतर त्यांना त्र्यंबकेश्वरच्या ग्रामस्थांनी आणि साधूसंतांनी विरोध केला आहे. गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी केलेल्या दाव्याचा विरोध अंजनेरी येथील ग्रामस्थांनी केला होता.