मजरेहोळ रस्ता दुरूस्तीसाठी तिव्र रास्तारोको आंदोलन
चोपडा (विश्वास वाडे) तालुक्यातील मजरेहोळ फाटा ते गांवपर्यंतचा १ ते दिड कि.मी.चा रस्ता वर्षानुवर्षांपासून खराब झाला असून त्यावरील डांबर व खडी उघडून रस्त्याच्या दुतर्फा पसरलेली आहे.ह्या रस्त्यावरून वापरताना गुराढोरांसह शेतकरी, शेतमजुर, पादचारी, लहान-मोठे वाहनधारक, चालक या सर्वांनाच मरण यातना सहन कराव्या लागत आहेत. याबाबत वृत्तपत्रात बातम्याही प्रसिध्द झालेल्या आहेत. परंतु याकडे संबंधित विभागाचे अक्षम्यं दुर्लक्ष झालेले आहे. त्यासाठी दि.१७ फेब्रुवारी २०२२(गुरूवार) रोजी स.१० वा.चोपडा अमळनेर मार्गावरिल मजरेहोळ फाट्याजवळ ग्रामस्थांतर्फे तिव्र रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये दिली आहे.
याबाबत शेकडों ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन चोपडा तहसीलदार, गटविकास अधिकारी, पी.आय.(शहर पो.स्टे.) यांना देण्यात आलेले आहे.याप्रसंगी सामा. कार्यकर्ते मधुसूदन बाविस्कर, लिलाचंद पाटील,रवींद्र पाटील, रणछोड पाटिल, कांतीलाल पाटील, श्याम पाटील, विशाल पाटील, समाधान पाटील यांची उपस्थिती होती.