गुन्हेगारीचोपडा

पतिने विषप्राशन केल्याने बिडगाव येथे दोन मुलीसह आईची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

चोपडा (विश्वास वाडे) येथुन जवळच असलेल्या बिडगाव ता. चोपडा येथे कौटुबिक वादातुन दोन मुलीसह आईने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटेनेमुळे सर्वत्र हळहळ व्यत्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर असे की, बिडगाव येथील विनोद विक्रम कोळी (बाविस्कर ) वय-४० हे आपल्या परिवारासह राहतात त्यात पत्नी वर्षा विनोद कोळी वय ३५ मोठी मुलगी खुशी विनोद कोळी, किर्ती विनोद कोळी, मोनाली विनोद कोळीयांच्यासह राहतात. घटनास्थळाच्या माहितीवरून काल दि. २ मार्च रोजी रात्री विनोद कोळी यांचे त्यांच्या आईवडिल भाऊ यांच्याशी काही कौटंूबिक वादा- वाद झाला त्यात त्यांना मनस्ताप घेऊन घरातील विषारी द्रव्यप्राशन केल्याने त्यांची तब्येत खराब झाली त्यांना जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असुन त्यांच्यावर तेथे उपचार सुरु आहेत, या घटनेची माहीती त्यांच्या पत्नी वर्षा विनोद कोळी यांना कळल्याने त्यांनी गावाजवळ बिडगाव शिवार गट क्र २३४ इकबाल शहादुर तडवी यांच्या मालकीच्या विहरीजवळ येत किर्ती वय ८, मोनाली विनोद कोळी वय ४यांना घेऊन उडी घेतल्याने त्यांचा त्यात मुत्यू झाला आहे.

सकाळी पोलीस पाटील रामकृष्ण गोरख पाटील यांनी अडावद पोलीस स्टेशनला कळविल्याने अडावद पोलिस स्टेशनचे सपोनि किरण दांडगे यांनी कर्मचारी आणी गावकऱ्यांना आणी दत्तु पाटील, छोटू तडवी यांना घेत विहरीत शोध मोहीम घेतली असता ३तास पर्यंत दोघं मुलींचे प्रेत हाती लागले होते, त्यानंतर विहीरीतले पाणी उपसल्यावर वर्षाकोळी यांचा मुतदेह हाती लागला,तीन्ही मुतदेह चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शविछेदनासाठी पाठविण्यात आले आहेत घटनास्थळी डिवाएसपी भास्कर डैरे यांनी भेट दिली. सदर घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे