महाराष्ट्र

मालपूर येथील तरूण भास्कर कोळी यांचा मोटरसायकल अपघातात मृत्यू

दोंडाईचातील शिंदखेडा उड्डाण पुलाजवळ झालेली घटना

दोंडाईचा : मालपूर ता.शिंदखेडा येथील व्यवसायाने मिस्तरी काम करणारे भास्कर ओंकार कोळी (वय-३९) हे आपली भाची सुन व अडीच वर्षाचा नातु यांना सोडायला उंटावद-शिरपुर ह्या गावी जात असताना दोंडाईचा येथील शिंदखेडा रस्त्यावर उड्डाण पुलाचे काम सुरू असलेल्या पिल्लरला मोटर सायकल क्रमांक एम.एच.१८-बी.के-००६९ ची जोरदार धडक दिल्याने मोटर सायकल चालक भास्कर कोळी यांचा जागीच मुत्यू झाला तर अन्य दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबबत मिळालेली माहिती अशी की,आज दिनांक २ जुन गुरूवार रोजी दुपारी मालपुर येथील व्यवसायाने मिस्तरी असलेले भास्कर ओंकार कोळी हे दीड वाजता आपली भाची सुन व अडीच वर्षाचा नातु यांना उंटावद-शिरपुर येथे माहेरी सोडायला निघाले असता.दोंडाईचा जवळ शिंदखेडा कडे जाणाऱ्या जुन्या रेल्वे गेटजवळ उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणीं कच्च्या रस्त्यावरून जाताना रहदारीचा अंदाज न आल्यामुळे उभ्या पिल्लरला हिरो कंपनीची एच.एफ.डिलक्स मोटर सायकल क्रमांक एम.एच.१८-बी.के-००६९ हीची जोरदार धडक दिल्याने जागेवरच भास्कर कोळी यांचा मुत्यू झाला तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत.याबाबबत दोंडाईचा पोलीस स्टेशनला मोटर अपघात कायदा खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे