महाराष्ट्र
बोदवड येथील पोलीस निरीक्षक गुंजाळ यांचा पत्रकार संघटनेमार्फत सत्कार
बोदवड (सतीश बाविस्कर) येथील पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ नुकतेच बोदवडला आले असून त्यांचा बोदवड पत्रकारांमार्फत सत्कार करण्यात आला.
याबाबत सविस्तर असे की, बोदवड पोलीस निरीक्षक बदली होऊन आले. त्यामुळे बोदवड येथील पत्रकारांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला. त्यावेळी थर्ड आय चे संपादक नंदलाल पठ्ठे यांच्यावर अमर डेअरी मालक यांनी आकस बुद्धीने बातमीचा राग आल्याने खंडणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो कोणत्या आधारावर दाखल केला याची चौकशी करून गुन्हा मागे घ्यावा, असे निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षकांनी सकारात्मक उत्तर देऊन निवेदन स्वीकारले. याप्रसंगी नंदलाल पठ्ठे, गोपीचंद सुरवाडे, सुरेश कोळी, अनिल देवकर, सतीश बाविस्कर, सचिन पाटील, अर्जुन आसाने, अमोल व्यवहारे आदी पत्रकार उपस्थित होते.