भव्य आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबीर
मुक्ताईनगर (सचिन झनके) ग्रामीण (शैलेश गुरचळ) अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्साहात निमित्त सर्व लोकांना आव्हान करण्यात आलेले आहेत. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे दिपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. मुक्ताईनगर काँग्रेस कमिटी डॉ.जगदीश पाटील व इतर राजकीय, सामाजिक लेकाच्या उपस्थित कार्यक्रमाची सुरुवात करण्यात मुक्ताईनगर तालुक्यात भव्य आरोग्य तपासणी शिबिर रक्तदान शिबिर नियोजन करण्यात आले.
अस्थिरोग तज्ञ डॉ पंकज घोगरे यांनी सर्वसामान्य नागरिकांचे हाडांची तपासणी मोफत करण्यात आली व लोकांना त्यासंदर्भात आव्हान करण्यात आले. मार्गदर्शन करण्यात आले त्याचप्रमाणे डॉ उल्हास पाटील गोदावरी मेडिकल हॉस्पिटल ब्लड बँकचे संपूर्ण टीम मुक्ताईनगर प्रवर्तन चौक या ठिकाणी ब्लड बँकेचा कॅम्प लावून एकूण -29 बॅगांची दिवसभरात रक्तदान करण्यात आले. त्याचप्रमाणे मुक्ताईनगर मधील 328 पेशंटचे मोफत तपासणी देखील करण्यात आली. हाडांचे ठिसूळपणा, शुगर तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्तगट तपासणी, एक्स-रे, अशा विविध प्रकारच्या तपासण्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त करण्यात आल्या आहे.
या कार्यक्रमाला सहकार्य म्हणून राजेश लखोजीराव जाधव समाज विकास बहुउद्देशीय संस्था मुक्ताईनगर, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, जाणता राजा फ्रेंड्स ग्रुप, युवा मराठा फाउंडेशन, वंदे मातरम ग्रुप, मुक्ताईनगर तालुका मराठा समाज, संत तुकाराम महाराज फाउंडेशन, मराठा सेवा संघ, श्री साई प्रतिष्ठान हरताळा, अर्थो केअर हॉस्पिटल मुक्ताईनगर, श्रीपाद डिजिटल एक्स-रे सेंटर, या सर्वांच्या सहकार्याने विविध ठिकाणी नियोजन व कार्यक्रम करण्यात आलेला आहे.