मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांची सभा ऐतिहासिक होणार : राज्यमंत्री अब्दुल सत्तार
सोयगाव येथील सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सोयगाव : भाजपच्या ढोंगी नेतृत्वाचा समाचार घेण्यासाठी येत्या 8 जून रोजी औरंगाबाद येथे मुख्यमंत्री ना. उद्धवसाहेब ठाकरे यांची सभा होणार असून या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगाव येथील सभेत केले.
ही सभा ऐतिहासिक होणार असून सभेत मुख्यमंत्र्यांकडून भाजपचा पर्दाफाश होणार असल्याने भाजपच्या गोटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सभेच्या पूर्व तयारी साठी तसेच भाजपच्या ढोंगी नेतृत्वाची पोलखोल करण्यासंदर्भात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची शुक्रवार (दि.3) रोजी सोयगाव शहरात जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, तालुका संघटक दिलीप मचे, नगराध्यक्षा आशाबी तडवी, उपनगराध्यक्षा सुरेखाताई प्रभाकर काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सभेत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपचा जोरदार समाचार घेतला. मोदी सरकारने सत्तेत येण्यापूर्वी अच्छे दिन चा नारा दिला होता . मात्र त्यांच्या आठ वर्षाच्या काळात वाढत्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे सामान्य जनता हैराण झाली आहे. देशात बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सरकारी आकडेवारी नुसार मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी देशातील बेरोजगारीचा दर 3.4 टक्के होता, तो आता 8.7 टक्के झाला. शेतकऱ्यांच्या विरोधात मोदी सरकारने कायदे आणले . देशातील सर्वसामान्य जनतेचा छळ करून केवळ उद्योगपतींची घरे भरण्याचे काम केले असल्याने केंद्रातील भाजप सरकारने जनतेची फसवणूक केली असल्याचा घणाघात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला. तर मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षात अनेक लोकाभिमुख निर्णय घेवून विकास कामे केली असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी मार्गदर्शन करतांना केंद्र सरकारकडून होणाऱ्या ईडीच्या करवाईवर निशाणा साधला. केंद्रातील भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना लक्ष करीत असून महाराष्ट्राची बदनामी करीत आहे. सूडबुद्धीने होणाऱ्या या कारवाईचा लवकरच पर्दाफाश होईल असे स्पष्ट करीत महाराष्ट्राची बदनामी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल व्यक्त केलेले अपशब्द शिवसैनिक खपून घेणार नाहीत असा इशारा जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी दिला.
उपजिल्हाप्रमुख राजू राठोड यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गेल्या दोन वर्षात मतदारसंघात 500 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार लोकाभिमुख निर्णय घेत असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमास जि.प. सदस्य गोपीचंद जाधव, शिवसेना शहरप्रमुख संतोष बोडखे, नगर पालिकेतील शिवसेना गटनेते अक्षय काळे, उपतालुकाप्रमुख गुलाबराव कोलते, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील पाटील, युवासेना शहरप्रमुख अमोल मापारी, कुणाल राजपूत, शिवप्पा चोपडे, दारासिंग चव्हाण, जि.प. समाजकल्याण सभापती मोनालीताई राठोड, शिवसेना महिला आघाडीच्या ध्रुपताबाई सोनवणे, सुरेखाताई तायडे, लताबाई चौधरी, नगरसेविका संध्याताई मापारी, कुसुमताई राजेंद्र दुतोंडे, नगरसेवक दीपक पगारे, रउफ शेख, हर्षल काळे, नारायण घनगाव, संदीप सुरडकर, भगवान जोहरे, योगेश इंगळे, कदिर शहा, गजानन माळी, अशोक खेडकर, लतीफ शहा यांच्यासह बाबू चव्हाण, सुपडू पाटील, भगवान पालकर, माजी सभापती धर्मसिंग चव्हाण,संदीप चौधरी, विक्रम चौधरी, सलीम खा, डॉ. लतीफ देशमुख, डॉ. जहांगीर आदींसह विविध गावातील सरपंच, विभागप्रमुख, शाखा प्रमुख व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.