उज्वल भविष्यासाठी आर्थिक नियोजन गरजेचे : अबरार अब्बासी
चोपडा (विश्वास वाडे) पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा येथे ट्रेनिंग प्लेसमेंट सेल व सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया व युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने गुंतवणूक नियोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पंकज श्रीवास्तव यांनी भविष्यकाळासाठी गुंतवणुकीचे महत्त्व विशद केले तसेच मार्गदर्शक अबरार अहमद अब्बासी यांनी उज्वल भविष्यासाठी आर्थिक नियोजन या विषयावर व्याख्यान दिले.
यावेळी अबरार अहमद अब्बासी यांनी कमाईपेक्षा खर्च कमी करा ,एकाच ठिकाणी बचत करू नका, कमाईच्या किमान १० टक्के रक्कम बचत केली पाहिजे असा मंत्र दिला तसेच त्यांनी बचतीचे फायदे सांगताना किसान विकास पत्र, फिक्स डिपॉझिट,विमा, स्टॉक मार्केट, रिअल इस्टेट,सोने,डिजिटल सोने यातील गुंतवणुकीच्या संकल्पना समजावून सांगितल्या. तसेच उज्वल भविष्यासाठी म्युचल फंड्सचे महत्व विशद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.महादेव वाघमोडे यांनी आजची छोटी बचत भविष्यासाठी कशी फायद्याची आहे याचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन ट्रेनिंग प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. संजय पाटील यांनी केले तर आभार प्रा. दिलीप प्राध्यापक दिलीप गिर्हे यांनी मानले.