“दारू मुक्त घर दारू मुक्त गाव” व्यसनमुक्ती अभियानाचा सुरत शहरात भव्य नागरी सत्कार गुजरात राज्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार सी आर पाटील यांच्या हस्ते गौरव
शिंदखेडा (यादवराव सावंत) तालुक्यातील विरदेल गावापासून व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून डॉ.कृष्णा रामचंद्र भावले यांनी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात फिरून बहुतांश व्यसनाधीन पिडीतांवर उपचार करून कुंटुब उद्धवस्त होण्यापासून वाचवले आहे. त्याचप्रमाणे व्यसनमुक्ती केंद्र हे गुजरात राज्यातील सुरत, उधना येथे साडेतीन वर्षात दहा हजार व्यसनी पिडीतांना उपचार करून व्यसनमुक्ती अभियानाने दहा हजारांचा टप्पा पार केल्याबद्दल दारु मुक्त घर दारु मुक्त गाव सुरत शहरात डॉ. कृष्णा भावले यांचा भव्य नागरी सत्कार गुजरात राज्यातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सी.आर.पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आमदार संगीता ताई पाटील, महापौर मनपा सुरत शहर सर्वपक्षीय नगरसेवक आणि हजारो कुटुंब या कार्यक्रमात उपस्थित होते. याप्रसंगी सुरत शहर व सुरत शहरातील सर्वात मोठ्या सर्व जातीय समूह लग्नाच्या प्रमुख अतिथी चा सपत्नीक सन्मान देऊन नागरी सत्कार करणाऱ्या व्यसनमुक्ती कार्याला गौरवन्वीत करून अभियानावर अतूट विश्वास प्रेम आणि सहकार्य करणाऱ्या सी. आर. पाटील प्रदेश अध्यक्ष गुजरात राज्य, आमदार संगीता पाटील, महापौर मनपा सुरत, सर्वपक्षीय नगरसेवक सुरत आणि विशेषता अभियानाचे खंदे साथी सुधाकर भाऊ चौधरी स्टान्डिग कमिटी सदस्य सुरत आणि तमाम गुजराती बांधवांचे अभियान टीमच्या सर्व साथी सहकार्याच्या सहभागाचा हा सन्मान आहे. साथिंनो तुमच्या सहकार्याचा सिंहाचा सहभाग आहे. मोहीमेत म्हणुन तर हे शक्य आहे.
अभियानाचा हा सन्मान हजारो पीडित व्यसनमुक्त परिवारांचा आशीर्वाद आहे. विनम्रपणे हा सन्मान व्यसनमुक्ती अभियानात सामील झालेल्या कुटुंबांना आणि अभियानाच्या सर्व साथी सहकार्यांना समर्पित करतो. लढा सुरू आहे. सुरू राहील. व्यसनामुळे तळमळणाऱ्या परिवारासाठी लढत राहील असे डॉ. कृष्णा भावले यांनी सांगितले.