भाजप सरकारने गेल्या आठ वर्षात जनतेची फसवणूक केलीये ; अब्दुल सत्तार
सिल्लोड : देशातील वाढती बेरोजगारी तसेच जीवनावश्यक वस्तू व इंधनाच्या दरात कायम होणारी दरवाढ देशासाठी चिंतेची बाब असून अच्छे दिनचे नारा देणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारने गेल्या आठ वर्षात जनतेची फसवणूक केली असल्याचा घणाघात महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथील सभेत केला.
शेतकऱ्यांना 11 व्या हप्त्याचे वितरण करून खतांच्या किमती दामदुप्पट करतात हेच का तुमचे अच्छे दिन असा सवाल करीत जगात शेतकऱ्यांचे सर्वाधिक मोठे आंदोलन आपल्या कृषिप्रधान देशात मोदी सरकारच्या विरोधात झाले ही दुर्दैवाची बाब असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. भाजपच्या अनागोंदी कारभाराचा समाचार घेण्यासाठी मुख्यमंत्री ना. उद्धवसाहेब ठाकरे यांची येत्या 8 जून रोजी औरंगाबाद येथे सभा होणार असून या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सभेच्या पूर्व तयारीसाठी तसेच भाजपच्या ढोंगी नेतृत्वाची पोलखोल करण्यासंदर्भात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची शुक्रवार (दि.3) रोजी सिल्लोड शहरात विराट सभा संपन्न झाली. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.
केंद्र सरकारचे दर वाढीवर कुठलेच नियंत्रण नसून देशातील जीवनावश्यक वस्तू तसेच इंधनाचे दर आटोक्यात आणले नाही तर भारतात श्रीलंके सारखी परिस्थिती उद्भवेल असे मत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले. जीएसटी सीएसटीच्या माध्यमातून प्रत्येक सामान्य माणूस दररोज कोट्यवधी रुपये केंद्र सरकारला देते. असे असले तरी केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राला न्याय देतांना सात्वणुकीची वागणूक देते. केवळ विरोधी पक्ष सत्तेत असल्याने बोगस कारवाया करून महाराष्ट्राची बदनामी करीत आहे अशा शब्दात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपचा जोरदार समाचार घेतला. केंद्रातील भाजप सरकारकडून महाराष्ट्राची होणारी बदनामी व अन्यायाचा परिणाम येत्या प्रत्येक निवडणुकीत भाजपला भोगावे लागतील असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
कोरोनाच्या संकटातही मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे तसेच नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांनी सिल्लोड – सोयगाव मतदारसंघातील विकासासाठी जवळपास 500 कोटींचा निधी दिला असून आणखी 500 कोटींचे प्रस्ताव मंजुरी स्तरावर आहेत. सिल्लोड मध्ये सिंचनाचा मेगा प्रोजेक्टला लवकरच सुरुवात होणार असून मतदारसंघात जल व्यवस्थापनाच्या माध्यमातून वॉटर बँक तयार करणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. ग्रामीण भागात ग्रामविकासाच्या योजना राबवून गावागावात पायाभूत व मूलभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या. तीर्थक्षेत्र विकास योजनेतून भविकभक्तांसाठी सुविधा निर्माण करून पूर्वी तीर्थक्षेत्र विकासाठी 30 लाख रुपये निधी मिळत होता यात वाढ करून आता 60 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. सिल्लोड नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात विकासाच्या अनेक योजना राबविण्यात आल्या असून भूमिगत गटार योजनेचा पहिला टप्याचे काम पूर्ण होऊन आता टप्पा दोन च्या कामाला सुरुवात होणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, किशोर अग्रवाल, सोयगाव तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, सिल्लोड तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जि.प. माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, विधानसभा संघटक सुदर्शन अग्रवाल, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष दुर्गाबाई पवार, युवासेना जिल्हाध्यक्ष कैलास जाधव, नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर अब्दुल सत्तार, शिवसेना शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, महिला आघाडीच्या दीपाली भवर, शकुंतलाबाई बन्सोड, डॉ. संजय जामकर, काकासाहेब राकडे ,विठ्ठल सपकाळ, रुउफ बागवान, सुधाकर पाटील , बेग चांद मिर्झा, शंकरराव खांडवे, शेख सत्तार हुसेन, रतनकुमार डोभाळ, आसिफ बागवान, सुनील दुधे, प्रशांत क्षीरसागर, शेख सलीम हुसेन ,शेख बाबर, राजु गौर, जुम्मा खा पठाण, मतीन देशमुख, मनोज झंवर, अकिल वसईकर, जितु आरके, अनिस कुरेशी , मोईन पठाण , शेख मोहसिन, रईस मुजावर, बबलू पठाण, रमेश साळवे, निजाम पठाण, नरेंद्र ( बापू ) पाटील, राजेंद्र ठोंबरे, मारुती वराडे, सयाजी वाघ, मधुकर गवळी, अब्दुल रहीम, नानासाहेब रहाटे, डॉ. दत्तात्रय भवर, अनिस पठाण, युवासेनेचे शेख इम्रान ( गुड्डू ), अक्षय मगर, प्रवीण मिरकर, योगेश शिंदे, गौरव सहारे, शिवा टोम्पे, संतोष खैरनार, फहिम पठाण, संतोष धाडगे, डॉ. झलवार, मानसिंग राजपूत, सुधाकर जाधव आदी पदाधिकाऱ्यांसह विविध गावातील सरपंच, विभागप्रमुख, शाखा प्रमुख, सिल्लोड शहर व तालुक्यातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.