डाक सेवक शेख सलिमाबी यांना “हिरकणी” आदर्श महिला पुरस्कार प्रदान
देगलूर (प्रतिनिधी) देगलूर येथील रहिवाशी असलेले बिलोली तालुक्यातील हिप्परगाथडी येथे ग्रामीण डाक सेवक म्हणून कार्यरत असलेल्या शेख सलिमाबी यांच्या कार्याची दखल घेऊन दैनिक आत्ताच एक्सप्रेस या वृत्तपत्राच्या वतीने ग्रामीण भागात पोस्टच्या योजना सर्वापर्यत पहुचत जिद्द चिकाटीने कार्य करणाऱ्या समाजासमोर एक आदर्श महिला म्हणुन समाजमनावर ठसा उमटविणार्या, अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत आपले बी.एस्स.सी पर्यंतचे शिक्षण घेऊन डाकविभागात गेल्या तीन वर्षापुर्वी बिलोली तालुक्यातील थडीहिप्परगा येथे ग्रामीण डाकसेवक म्हणून नौकरीस लागलेल्या देगलूर येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार जावेद अहेमद यांच्या पत्नी शेख सलीमाबी चांदसाब यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटविला. यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत औरंगाबाद येथील मराठवाडा प्रशिक्षण प्रबोधनी सभागृहात दैनिक आत्ताच एक्सप्रेस या दैनिकाच्या वर्धापन दिनानिमित्त मिनाताई शेळके अध्यक्ष जि.प.औरंगाबाद, वसंतराव मुंडे प्रदेश अध्यक्ष मराठी पत्रकार संघ,संपादक सुग्रीव मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत “हिरकणी”आदर्श महिला पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या पुरस्काराबद्दल भाजपचे प्रदेश निमंत्रित सदस्य रामदास पाटील सुमठांनकर, डाक निरीक्षक बी. ए. मुंडे, पोस्ट मास्तर मिलिंद देवूडकर, माजी डाक निरीक्षक एस एस नानिर, सोसायटीचे संचालक गंगाधर भीलवंडे, मुंबई येथील मेलगार्ड सुरेश रोडेवाड, अब्दुल रहीम पाशा पटेल, मेलवरसल जमनोर, राजकुमार चोपडे, व्यवस्थपकिय सपादक सुमन पोलशेट्वर, प्रहार जनशक्ती तालुका प्रमुख कैलास येसगे, नगराध्क्ष मोगलाजी शिर्षेट्वर, उद्योजक हणमंत शिंदे, नगरसेवक शेख महेमुद, शैलेश उल्लेवार, सामाजिक कार्कर्त्यां अमरपाली येसगे, गुलाम अली, वैभव मुर्के, विठल पोलकमवाड, शिवाजी डोगरे, दस्तगीर शेख, मस्तान शेख, इसमाइल पोखरनिकर, बिलोलीचे पत्रकार सय्यद रियाज, मुक्रामबादचे पञकार जलील पठाण, शेख अफझल, शेख आसिफ, शेख पाशा, शेख हैदर, शेख नयुम, शेख खायुम, शेख साजिद, शेख रफिक, सय्यद गौस, जबार हिग्निकर, शेख असलम नांदेडकर, सय्यद मोहम्मद, युनूस, शेख अर्शद आई व मित्रपरिवार यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.