महाराष्ट्रराजकीय
महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे मतिमंदाना अन्नदान
बोदवड (प्रतिनिधी) बोदवड शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मतिमंदाना अन्नदान करून आज १६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. व्यसनमुक्ती / मनोरुग्ण केंद्र या ठिकाणी असलेले रुग्णांना एक वेळाच जेवण देऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी एक आगळावेगळा सोहळा वर्धापन दिनी साजरा केला.
या ठिकाणी बोदवड शहरातील व तालुक्यातील मनसे प्रेमी यांनी सहभाग घेतला. मनोरुग्णांना एक वेळ जेवणाचे नियोजन करू असा संदेश तालुका वाशी यांना दिला व इतर लोकांनी पण असेच कार्य करून मनोरुग्णांना धैर्य द्यावं असे जनतेला उद्देश केले. याठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मोहन माळी, करण गंगातीरे, संदीप पाटील, राहुल हिवराळे, दिलीप तेली, सतीश मोरे, अक्षय कवळकरसह इतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.