आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
वैजापूर आरोग्य विभागाने घेतला मोठा निर्णय
वैजापूर (गहिनीनाथ) कोविड -19 लस घ्या व पेट्रोल मिळवा हा उपक्रम राबवला. या अगोदर आरोग्य विभागाने सार्वजनिक ठिकाणी म्हणजे शाळा ग्रामपंचायत कार्यालय कॉलेजेस अशा ठिकाणी कोविड -19 ची लस देण्यात आली होती. पण नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे लस घेण्याचे जे व्यक्ती राहिले होते. त्यासाठी बोरसर येथील आरोग्य विभागाने चक्क दहेगाव येथील रामकृष्ण पेट्रोलियम येथे जाऊन पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या व्यक्तींना कोविड -19 ची लस दिली. ज्यांनी पहिली लस घेतलेली आहे. त्यांना दुसरी लस देण्यात आली व ज्यांनी पहिली लस घेतली नाही त्यांना पहिली लस देण्यात आली. त्यावेळेस आरोग्य विभागाचे कर्मचारी दिवाण सुजता, ए एम एम व पवार एस के एम पी डब्ल्यू या दोन्ही कर्मचाऱ्यांनी नागरिकांना लस दिली.