मुरूम ने भरलेल्या ढम्पर ने केली वाहतूक ठप्प, नागरिक झालेत त्रस्त.
अमळनेर (विशेष प्रतिनिधी)
दिनांक: १५ डिसेंबर २०२२
शहरातील दगडी दरवाज्याजवळ मुरमाने भरलेले ढम्पर क्रमांक MH-19 Z-3349 मध्ये बिघाड झाल्याने सदर ढम्पर हे भर रस्तात बंद पडल्याने दोघ बाजूनी वाहतुक कोंडी मोठी निर्माण झाली होती. यामुळे नागरिक मोठे त्रस्त झालेत.
सदर मुरूम विणापरवाना असल्याने ढम्पर चालक हा जागेवर नाही असेही वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांचे म्हणणे होते. या संदर्भात अमळनेर तालुक्याचे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्याशी स्पीड न्यूज महाराष्ट्र ने सपंर्क साधला असता त्यांनी घटनास्थळी माणूस पाठवून चौकशी करून सांगतो असे सांगितले.
तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी चौकशी करून सांगितले की सदर स्थळी ढम्पर नाहीच प्रश्न निर्माण होतो. अचानक ढम्पर गेले कुठे? तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना मुरमाने भरलेले ढम्पर क्रमांक MH-19 Z-3349 बाबत अधिक माहिती विचारली असता.
याबाबत चौकशी करून कळेल असे सांगितले. आता प्रश्न निर्माण होतो. मुरमाने भरलेले ढम्पर वैध होते की अवैध महसूल प्रशासन याचा तपास करेल की हा विषय हवेत विरून जाईल.
रोजची ताजा घडामोडीसाठी “डिजिटल युगाचे निर्भिड माध्यम” स्पीडन्यूज महाराष्ट्र आता पहा यूट्यूब च्या खालील👇लिंक वर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरु नका.
https://youtube.com/channel/UCIEJK-1t0MDN0BhTn6EbEXg