केन्द्रीय विद्यालय संगठन आयुध निर्माणी भुसावळचा ५९ वा स्थापन दिवस उत्साहात साजरा.
भुसावळ:अखिलेशकुमार धिमान
दिनांक-१६ डिसेंबर २०२२
केंद्रीय विद्यालय भुसावळ येथे दिनांक १५ डिसेंबर रोजी ५९ वा केवीएस स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य नितीन कुमार उपाध्याय होते. कार्यक्रमाचे सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. स्वागतोत भाषण सीमा बाथम टीजीटी इंग्रजी यांनी केले.
या प्रसंगी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत गीताने करण्यात आले. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यानंतर केवीएस चे स्थापना गीत प्रस्तुत केले. विद्यालयातील वरिष्ठ शिक्षिका रंजना विगम यांनी या वेळी केवीएस च्या स्थापनेविषयी माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संबंधित विषयावर कविता प्रस्तुत केल्या तसेच भाषण दिले. याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या दिवसाचे निमित्त साधून विद्यालयातील भूतपूर्व विद्यार्थ्यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. शाळेतून शिकून गेलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत.
त्यातीलच देवेंद्रसिंह ठाकूर यांनी संस्कार चैनल वर भजन गायक म्हणून प्रसिद्ध मिळवली आहेत. त्यांनादेखील कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी त्याप्रसंगी एक भजन ही प्रस्तुत केले. केंद्रीय विद्यालय संगठनाची स्थापना भारतीय शिक्षण क्षेत्रात एक मैलाचा दगड आहे.
असे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य श्री नितीन कुमार उपाध्याय यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अखिलेश कुमार पांडे यांनी केले. आभार प्रदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश नरहिरे केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व शिक्षकांनी सुद्धा प्रयत्न केले.
रोजची ताजा घडामोडीसाठी “डिजिटल युगाचे निर्भिड माध्यम” स्पीडन्यूज महाराष्ट्र आता पहा यूट्यूब च्या खालील👇लिंक वर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरु नका.
https://youtube.com/channel/UCIEJK-1t0MDN0BhTn6EbEXg
http://www.speednewsmaharashtra.com