चालू वर्ष संपून नवीन वर्ष सुरु होण्यास अगदी थोडा अवधी शिल्लक आहे. तुम्ही देखील हे वर्ष सुरु होण्यापूर्वी काही संकल्प केलेच असतील. तर आत्ता वेळ आलेली आहे, तो संकल्प किती प्रमाणात पूर्ण झाला याचा हिशोब मांडण्याची. झालेत का तुमचे संकल्प पूर्ण? काय म्हणता तुम्ही प्रयत्न करूनही हे संकल्प अर्ध्यातच सुटले? कसं काय?
खरंतर संकल्प अर्ध्यावर सोडून देणारी किंवा संकल्प तडीस जातच नाही अशी तक्रार करणारी अनेक माणसं आपल्याला अवतीभोवती सापडतील आणि यावर्षीचा माझा संकल्प पूर्ण झाला म्हणून आनंदाने उड्या मारणारे पण सापडतील.