शिंदखेडा नगरपंचायतच्या थकीत आठ गाळे धारकांवर कारवाई ; गाळे केले सील
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील नगरपंचायत च्या वतीने आज दि. २२/०३/२०२२ रोजी मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांच्या उपस्थितीत शिंडखेडा शहरातील गाळे धारकांवर जागा भाडे वसूली पोटी कार्यवाही करण्यात आली. २०००० हुन अधिक बाकी असलेल्या गळ्यां पैकी ८ गाळे सील करण्यात आले.
या आधी थकीत गाळे धारकांना मुदतीत भरण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या. नगरपंचायत हद्दीत एकुण 52 गाळे आहेत.त्यातील बहुतांश गाळे धारकांवर थकीत भाडे आहेत. तसेच इटरांकडून ३० ते ५० ℅ रक्कम वसूल करून बाकी रक्कम भरणा करिता ३१ मार्च पर्यंत मुदत देण्यात आली. मार्च अखेर थकबाकी रकमेचा भरणा न केल्यास त्यांच्यावर देखिल सील करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांनी सांगितले. सदर वसूली पथकात प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे, कर वसुली अधिकारी, वामन अहिरे, मनोज पाटिल, पंडित माळी, अनिल लोहार, नरेंद्र बड़गूजर, अशोक माळी, दीपक महाजन, नेश्वर बोरसे, गोविंदा पाटोले, इ कर्मचारी यानी परिश्रम घेतले.