वैजापूर तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या नावाने आत्मदहनाचा इशारा
वैजापूर (गहिनीनाथ वाघ) उपविभागीय अधिकारी वैजापूर यांना तहसिलदार वैजापूर यांची शासकिय कामासाठी वाहनाची निकड लक्षात घेता त्यांना वाहन भाडेतत्वावर उपलब्ध करून देणे करीता शासन निर्णय दिनांक 01 डिसेंबर 2016 चे अनुषंगाने कार्यवाही करण्यास मान्यता दिली आहे. तसेच तहसिलदार वैजापूर यांना नविन वाहन प्राप्त झाल्यानंतर भाडेतत्वावर लावण्यात आलेले वाहन तात्काळ बंद करावे असे आदेशित केले आहे. परंतु अदयाप पर्यंत माझे दिनांक 27/08/2018 पासुनचे थकीत असलेले वाहन भाडे मिळालेले नाही.
तसेच माझे वाहन क्रमांक MH17 AZ 8366 (वाहन महिंद्रा स्कार्पियो) दिनांक 27/08/2018 पासुन आजपर्यंत भाडे रक्कम रुपये 1520000/- (पंधरा लाख विस हजार रुपये मात्र) मला मिळालेले नाही त्यासाठी मी वेळोवेळी पाठपुरावा करूनही मला माझे मेहनतीचे वाहन भाडे मिळालेले नाही. माझ्या कुटूंबाची उदरनिर्वाह व गाडीचे वेळोवेळी दुरुस्ती काम मी कर्जकाढून करीत आहे. मला झालेल्या मानसिक त्रासाला कंटाळून मी दिनांक 21/03/2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे आत्मदहन करणार होतो. माझ्या या परिस्थीतीला वैजापूर येथील उपविभागीय अधिकारी वैजापूर व तहसिलदार राहुल गायकवाड तसेच उपविभागीय कार्यालय वैजापूर येथील प्रतीनियुक्तीवर कार्यरत असलेले दिपक त्रिभुवन अव्वल कारकून हे जवाबदार आहे. मी यांना वारंवार कळवून देखील यांनी मला कोणताच प्रतिसाद दिलेला नाही. म्हणून मी माझे भाड्याचे पैसे लवकरात लवकर मिळाले नाही तर मी पुन्हा लेखी स्वरूपात अर्ज करून आत्मदहन करणार मला काही झाल्यास याला जबाबदार फक्त आणि फक्त तहसीलदार राहुल गायकवाड व अव्वल कारकून दीपक त्रिभुवन हे राहतील.