आशोकराव चव्हाण यांना कठीण काळात आमदार राजुरकरांची भक्कम साथ : माजी खासदार भास्करराव पाटील
देगलुर (मारोती हनेगावे) नायगाव तालुक्यातील नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, व सर्व ग्रामपंचायत सदस्य, यांचा सन्मान सोहळा व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन काँग्रेसच्या वतीने केले गेले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर बोलत होते.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार जितेश भाऊ अंतापूरकर, माजी आमदार वसंतराव चव्हाण,माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ गीता नारायण जाधव, जिल्हा परिषद सदस्य सौ मीनल ताई खतगावकर, शिक्षण सभापती संजय बेळगे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रावसाहेब मोरे ,उपनगराध्यक्ष विजय चव्हाण, पंचायत समिती उपसभापती संजय शेळगावकर, प्राध्यापक रवींद्र चव्हाण, रवी पाटील खतगावकर, बालाजी मद्देवाड, पप्पू कोंडेकर, डॉक्टर शिवाजी कागडे,व इतर मान्यवर उपस्थिती होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोव्हिड काळात जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते त्यास प्रतिसाद म्हणून श्रीनिवास पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महारक्तदान शिबीर घेण्यात आले.
या वेळी जवळपास शंभर पिशव्या रक्त संकलन करण्यात आले. तसेच बोलताना खतगावकर यांनी डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या कठीण काळात आम्ही साहेब सोबत होतो तसेच नामदार अशोकराव चव्हाण यांच्या कठीण काळात आमदार अमरनाथ राजूरकर यांची भक्कम पणे चव्हाण साहेबांना साथ दिली व महानगरपालिका व जिल्हा परिषदेचे स्पष्ट बहुमत साहेबांच्या नेतृत्वात आणले गेले, व नुकत्याच देगलूर पोटनिवडणुकीमध्ये देगलूरकरांनी अशोकराव साहेबांवर विश्वास ठेवून बहुमतांनी अंतापूरकर यांना निवडून दिले नेहमी साहेबांनी विकासाचे राजकारण केले असून वैयक्तिक द्वेषातून नव्हे तर विकासावर राजकारण करावे असा टोला सुद्धा त्यांनी विरोधकांना लगावला.