बोदवड येथे गरजू विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप
बोदवड (प्रतिनिधी) आज जि.प.शाळा जलचक्र ता.बोदवड येथे “बोदवडचा राजा ” श्री.गणेश मंदिर सभासदांच्या वतीने गेल्या तीन वर्षात भाविक भक्तांना मंदिर समितीच्या वतीने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत जमा झालेल्या वह्या व पेन आज शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या.
यावेळी शाळेच्या वतीने मंदिर समिती सदस्य व नवनियुक्त नगराध्यक्ष आनंदाकाका पाटील यांचा सत्कार करण्यात आला. जि.प.सदस्या – वर्षाताई रामदास पाटील व बाजार समिती संचालक रामदास पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. उपस्थिता मध्ये मंदिर समिती उपाध्यक्ष – माधुरीताई पुरूषोत्तम गड्डम, विजय पालवे, हरीषभाई पटेल, दिपकजी झांबड, पवनकुमार दिनकर पाटील, शैलेश भुतडा व अध्यक्षा – प्रमिला संजय वराडे होत्या यावेळी जलचक्र येथिल जि.प.शाळा कायमस्वरूपी बोदवडचा राजाच्या समितीने दत्तक घेतलीय.मग वृक्षलागवड असो की शैक्षणिक साहित्य पुरविणे असो.सेवा हाच धर्म …तीच खरी परमेश्वराची भक्ती.