व्हिडीओ अल्बम स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न
उरण (विठ्ठल ममताबादे) महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेतर्फे मराठी व्हिडीओ अल्बम गाण्याची भव्य स्पर्धा २०२२ ला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेचे बक्षीस वितरण ससून हॉल, साईनगर सोसायटी, शिर्के गार्डन शेजारी, कळंबोली, तालुका पनवेल येथे मनसेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सर्वोत्कृष्ठ प्रथम गीत एकच वादा राजू दादा (परमेश माळी ), दुसरा नंबर -ओ शेठ… (संध्या प्राणिकेत) 3 रा नंबर -तुझी माझी कहाणी या गाण्याला बक्षीस मिळाले.
सर्व विजेते स्पर्धकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन मनसे चित्रपट सेना रायगड जिल्हाध्यक्ष अक्षय सुतार यांनी केले होते. बक्षीस वितरण मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या हस्ते पार पडले. बक्षीस वितरण प्रसंगी चित्रपट सेना संयुक्त सरचिटणीस संदीप सावंत, मनसे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे, रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत, महिला जिल्हाध्यक्ष अदिती सोनार आदी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.