वंचीत बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष धैर्यंवर्धन फुडंकर यांच्या उपस्थीत खामगांव येथे होणार बैठक
बुलढाणा (मिलींद बोदडे) वंचीत बहुजन आघाडीच्या वतिने खामगांव येथे वंचीत बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष यांच्या उपस्थीत बैठक २३/२/२०२२ ला कोल्हटकर स्मारक उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालया जवळ आयोजीत केली आहे.
आपल्या क्षेत्रातील लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत नगरपालीकेतील ३ वर्षाची निवडनुकीची माहीती ग्रामशाखा बुथशाखा वार्डगण गटतालुका व शहर जिल्हा पातळीवर केलेल्या कामाची यादी तसेच महानगर पालीका नगर पालीका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडनुक संदर्भात ईच्छुक उमेदवार निवडनुक प्रकिया मुलाखती बाबत आढावा बैठक आयोजीत केली आहे. तरी शहर कार्यकारणी महीला आघाडी, युवा आघाडी, तालुका कार्यकारणी भारीप बहुजन महासंघाचे आजी माजी पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी, समर्थक व हितचितंक यांना येण्याचे आव्हान वंचीत बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष युवराज भिडे मोताळा व त्यांच्या सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.