महाराष्ट्र
बालिकेवर अत्याचार करणाऱ्या दोषींवर कारवाई व्हावी ; तेली समाजाच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
धुळे (विक्की आहिरे) शहरात जिल्हाधिकारी कार्यालयात आज तेली समाजाच्या वतीने धरणगाव आणि कृषी कॉलनी येथे बालिकेवर अत्याचार करणाऱ्या दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी माजी महापौर भगवान करनकाळ यांच्या नेतृत्वात उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांना लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर जयश्री अहिरराव तेली समाजाचे कार्यकर्ते मानसिक उपस्थित होते.