रोटरी डे मॅरॅथॉन रन फॉर पिस स्पर्धा
धुळे (करण ठाकरे) रोटरी डेचे औचित्य साधून २३ फेब्रुवारी रोजी रोटरॅक्ट क्लब, ईनर व्हिल, रोटरी क्लब ऑफ धुळे, गोल्ड जिम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अशा मॅरथॉन रन फॉर पिस स्पर्धा घेण्यात आली. उपशिक्षिका मनिषा पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
यात महिला मुली, पुरुष वर्ग यांनी सक्रिय सहभाग नोंदवला यात X किमी रनसाठी दसरा मैदान ते अजमेरा आयुर्वेद महाविद्यालय पर्यंत होती. यात शहरातील जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय संपादन केले होते. धुळेतील उपशिक्षिका मनिषा पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना रोटरी क्लब चे प्रमुख हर्षद देशपांडे व प्रेसिडेंट श्वेता देशपांडे तसेच प्रमुख नैना वाणी, गोल्ड जिम चे प्रमुख या मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक प्रशस्तीपत्रक टी शर्ट देवन गौरविण्यात आले. यापूर्वीही मनिषा पाटील यांनी महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित मॅरेथॉन मध्ये यश तसेच २०१५ मध्ये आमदार चषक रनिंग स्पर्धेत तालुका जिल्हा स्तरावर प्रथम तसेच विभाग स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला होता. त्यांच्या यशाबद्दल आमदार कुणाल पाटील, एस. टी. पाटील, प्रमोद पाटील यांनी समाधान व्यक्त केले.