चोपडा
बुद्धविहारासाठी जागा उपलब्ध करून द्यावी म्हणून सनपुले ग्रामपंचायतमध्ये अर्ज सादर
चोपडा (सिद्धार्थ बाविस्कर) आज सनपुले येथील नवबौध्द व दलीत समाज बांधवांनी बुद्धविहारासाठी जागा उपलब्ध करून द्यावी म्हणून ग्रामपंचायत मध्ये अर्ज सादर केला.
अर्जात म्हटले आहे की, दलीत वस्तीला लागून उत्तर दक्षिण रस्त्याला लागून जी बाखंड जागा ग्रामपंचयत मालकीची आहे ती जागा बुद्धविहारासाठी मिळावी यासाठी अर्ज केला. अर्ज स्विकार करतांना ग्रामसेवक संदिप पाटील, सरपंच हिरामण पाटील, सदस्य शिवजी पाटील व जमलेले सर्व नवबौध्द व दलीत समाज बांधव युवराज बाविस्कर, विजय बाविस्कर, वासुदेव बाविस्कर, समाधान बाविस्कर, कैलास बावीस्कर, दगडू बावीस्कर, आनंद बावीस्कर, शांतीलाल बाविस्कर, रामदास बाविस्कर, विजय वानखेडे, उत्तम बावीस्कर, हिरालाल बावीस्कर, दशरथ साळवे इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.