महाराष्ट्र

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते केऱ्हाळा येथील विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

सिल्लोड : महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने केऱ्हाळा येथील पानंद रस्त्यासाठी 98 लाख तर गावात रस्त्यासह पूल बांधकाम करणे यासाठी 27 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली. गुरुवार (दि.2) रोजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते या मंजूर कामांचे भूमिपूजन संपन्न झाले.

केऱ्हाळा गावात विविध ठिकाणी सामाजिक सभागृहासाठी तसेच पायाभूत व मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी देणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गावातील सुरू असलेल्या भूमिगत गटार तसेच इतर विकास कामांची पाहणी करून आढावा घेतला. मतदारसंघात मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते विकास योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी ही एक महत्वकांक्षी योजना असून सदरील रस्त्याची कामे सुरू असताना शेतकऱ्यांनी आपले अतिक्रमण स्वतः हुन काढून घ्यावे असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गावकऱ्यांना केले. उदघाटन करण्यात आलेल्या कामाला लगेच सुरुवात करावी. काम गुणवत्तापूर्ण व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने केऱ्हाळा ते केऱ्हाळा फाटा बांबर्डे वस्ती कडे जाणार रस्ता करणे 48 लाख , केऱ्हाळा ते बाभूळगाव रस्ता करणे 48 लाख तर गावात रस्त्यासह पुलाचे बांधकाम करणे 27 लाख असे जवळपास 1 कोटी 10 लाख रुपयांच्या मंजूर विकास कामांचे उदघाटन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, जि.प. माजी अध्यक्ष श्रीराम पा. महाजन, माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, राजेंद्र ठोंबरे, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, सरपंच सविताबाई दत्ता कुडके, उपसरपंच हकीम पठाण यांच्यासह विनायक पांढरे, नामदेव पांढरे, लक्ष्मण दुधे, एकनाथ पांढरे, पवार महाराज, नामदेव महाराज मिसाळ, समाधान पांढरे, शेख ईसा, आशक अली, सांडू खासाब, शिवाजी कुमावत, युसुफ बेपारी आदींसह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे