पिंपळनेर येथे शिवजयंतीनिमित्त मनसेकडून रक्तदान शिबिर !
साक्री (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळनेर येथे अखंड हिन्दूस्थानाचे अराद्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने प्रतीमा पूजन करून काळाची गरज लक्षात घेता रक्तदान शिबीर घेण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष राज ठाकरे ९,मार्च २०२२,रोजी पुणे येथे पक्षाचा वर्धापन दिना निमित्ताने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना आव्हान करण्यात आले होते की छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथी प्रमाणे ही साजरी झाली पाहिजे त्या अनुषंगाने साहेबाचे आदेशाचे पालन करत आज रोजी दि. २१.मार्च च्या दिवशी शिवजयंती साजरी करण्यात आली. या रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंपळनेर अप्पर तहसीलदार विनायक थविल व पिंपळनेर पोलिस स्टेशन चे कर्तव्य दक्ष ए.पी.आय. सचिन साळुंखे, होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे,मनसे राज्य उपाध्यक्ष व धुळे जिल्हा संघटक धिरज भैय्या देसले, पंचायत समिती चे माजी सभापती संजय ठाकरे,प.स.सदस्य देवेंद्र गागुर्डे,शाम पगारे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद गागुर्डे, व योगेश बधान हे उपस्थित होते या रक्तदान शिबिरात.७८,रक्तदात्यानी रक्तदान केले व रक्त दात्याना प्रमाणपत्र सह भेट वस्तू देण्यात आली.या कार्यक्रमा प्रसंगी माजी तालुका अध्यक्ष शिवा जिरे पाटील, साक्री तालुका उपाध्यक्ष वैजनाथ घरटे,योगेश दाभाडे पाटील, योगेश मोरे ता.उपाध्यक्ष (जनहित) हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन साक्री तालुका अध्यक्ष संदिप बच्छाव (बाबा पत्रकार) पिंपळनेर शहर अध्यक्ष स्वामी खरोटे, व मनविसे ता.उपाध्यक्ष मोहीत जैन, राकेश मांडोळे, शेखर शिरसाठ, बंटी सोनवणे, यांनी केले. या रक्तदान शिबिराला अर्पण रक्तपेढी धुळे यांचे सहकार्य लाभले.