धुळे जिल्ह्यात भाजपला खिंडार नगाव ग्रा.प. सदस्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
धुळे (प्रतिनिधी) धुळे तालुक्यातील नगाव ग्रामपंचायतीच्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्या शितल अभिमान भवरे यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांनी सत्कार करून स्वागत केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात आणि तालुक्यात काँग्रेस दिवसेदिवस मजबुत होत आहे. आ. कुणाल पाटील आणि काँग्रेसच्या कार्यशैलीमुळे भाजपामधुन काँग्रेस पक्षात येणार्यांचा ओढा वाढला आहोनक ताच कुंडाणे (वेल्हाणे) येथील भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. आता जिल्हयाच्या आणि तालुक्याच्या दृष्टीने राजकारणाच्या घडामोडीत नेहमीच चर्चेत असलेले नगाव येथील ग्रामपंचायतीचे सदस्यभाजपाच्या कट्टर समर्थक शितल अभिमन भवरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत अनिल भवरे, गोपाल भवरे व इतर कार्यकर्त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आ. कुणाल पाटील यांच्या देवपूर धुळे येथील संपर्क कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या युवक मेळाव्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आ. कुणाल पाटील यांच्यासोबत काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, शहराध्यक्ष माजी आ.प्रा. शरद पाटील, महिला काँग्रेस अध्यक्षा गायत्री जयस्वाल, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, माजी पं. स. सदस्य भगवान गर्दे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे, बाजार समितीचे मुख्य प्रशासक रितेश पाटील, युवा नेते सागर पाटील, माजी जि.प. सदस्य साहेबराव खैरनार, ज्येष्ठ नेते शशी रवंदळे, माजी पं. स. सदस्य पंढीनाथ, डॉ. एस. टी. पाटील, तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक सुडके, जितेंद्र पवार, ज्येष्ठ नेते जगन्नाथ बैसाणे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गर्दे, माजी अध्यक्ष हर्षल साळुंके आदी उपस्थित होते.