शिंदखेडा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचा प्रचार शिगेला सहकार व शेतकरी विकास पॅनलमध्ये चुरस
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक लागली उद्या (12 जुन) मतदान होणार आहे. सदर निवडणुकीसाठी माजी नगराध्यक्ष दीपक दादा देसले यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल व यांच्या विरोधात शेतकरी विकास पॅनल नगरपंचायत गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे हयांच्या माध्यमातून प्रचारात आघाडी घेतली आहे. आपला विजय निश्चित असताना सर्वच्या सर्व जागा निवडणुकीत निवडून येतील असा आशावाद यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.

शेतकरी विकास पॅनलचे निवडणूक प्रचारात माजी नगराध्यक्ष दीपक दादा देसले, विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, नगरसेवक उदय देसले, अशोक बोरसे, किरण थोरात, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रवीण पाटील, अँड. निलेश देसले, शिवसेनेचे तालुका समन्वयक विनायक पवार, महमूद शेख, पीक संरक्षण सोसायटीचे चेअरमन नाना चौधरी, माजी सरपंच काशिनाथ कृष्णा भदाणे यांसह पदाधिकारी सहभागी झाले होते तर त्यांच्या परस्पर विरोधी नगरपंचायत गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या नेतृत्वात सहकार पॅनल उभे ठाकले होते. त्यांनी देखील प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. सर्वच्या सर्व जागा निवडून येईल असे प्रचाराच्या प्रतिसादामुळे सांगत आहे.
यावेळी प्रचारात गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, उपनगराध्यक्ष प्रकाश नागो देसले, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी, प्रकाश चौधरी, दयाराम देवराम माळी, देविदास नारायण माळी, धर्मराज नागो माळी, अशोक शंकरराव देसले,आर.एच. भामरे, फकीरा धर्मा देसले, मनोहर गोरख पाटील, संभाजी गोरख देसले, स्वीकृत नगरसेवक अरुण देसले ,गणेश मराठे, संजय बडगुजर, गोटण चौधरी, भाजप शहराध्यक्ष प्रवीण माळी ,दीपक चौधरी, शिंदखेडा तालुका रेल्वे प्रवासीचे तालुकाध्यक्ष दादा मराठे ,उमेश गिरासे, चेतन परमार, अँड. विनोद पाटील, मोहन परदेशी यांसह पदाधिकारी प्रचारात सहभागी झाले होते सदर मतदान 12 तारखेला होत असून आज प्रचार थंडावला आहे सहकार पॅनल व शेतकरी विकास पॅनल च्या माध्यमातून दोघांनीही प्रचारात आघाडी घेतली होती अखेर दोघांचेही भवितव्य उद्या बंद होणार असून शेतकरी मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार हे करणार आहे.



