शिंदखेडा तालुक्यातील आरावे येथील ह.भ.प खानदेश रत्न जनार्दन महाराज यांच्या श्रवणाचा लाभ झी टॉकीजवर
शिंदखेडा (यादवराव सावंत) श्री झुंबरलाल जी खतोट यांच्या पुण्यस्मरण निमित्त झालेली श्रीमद् भागवत कथा श्री हभप, खानदेश रत्न भागवताचार्य, जनार्दन महाराज आरावेकर यांच्या वाणीतून प्रक्षेपित होत आहे. दिनांक 10/06/2022पासून 18/06/2022 पर्यंत झी टॉकीज वर सकाळी 7:38ते 9:30पर्यंत तारीफ करण्यात येणार आहे.
खानदेशातील धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील आरावे येथील सामान्य शेतकरी वारकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला सुरवातीपासून त्यांना लहानपणापासून पारमार्थिक क्षेत्राची आवड असल्याने, गावातील वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात असल्याने त्या वेळी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैकुंठ वाशी हभप नथेसिंग बाबा यांचा परिसरातभक्ती दौरा येत असल्याने देवी जनार्दन बाबा देखील कार्यक्रमांना हजेरी लावून वारकरी संप्रदाय आपणही या मार्गात जावे असा निश्चय केला. त्यावेळी बोरीस ते आळंदी पायी यात्रा ह भ प जनार्दन महाराज घेउन जात असताना त्या दिंडीत पायी यात्रा केली या दिंडीत किर्तन भजन गवळण आदींची आवड निर्माण झाल्याने, महाराजांनी आळंदी येथे राहण्याचा निर्णय घेतला. वारकरी शिक्षण संस्थेचे वैकुंठ वाशी ह भ प नथेसिग, बाबा मोठे बाबा, या थोर साधूंच्या सानिध्यात आल्याने वयाच्या सतराव्या वर्षी जनार्दन महाराजांनी बारावीचे शिक्षण सोडून वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेतले. तेथेच त्यांना बाल ब्रह्मचारी वत घेऊन उत्कृष्ट गायन व कीर्तन करू लागले.
पुढे ते बाबांचे विश्वासू शिष्य म्हणून विश्वास संपादन केला आणि त्यातून उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून घडल्याने पूर्ण खानदेशात नावारूपास आले. आज संपूर्ण महाराष्ट्रात ह भ प भागवताचार्य, जनार्दन महाराज यांची कीर्तन तसेच कथा चालू आहेत,,, झी टॉकिज वरून झुंबरलाल जी खटोड यांचे पुण्यस्मरणार्थ भागवत कथा प्रसारित करण्यात येत असल्याने त्यांच्या कथेमुळे खान्देश पुत्र भागवताचार्य ह.भ.प. जनार्दन महाराज आरावेकर यांचा कथेचा लाभ घ्यावा असे आव्हान भडणे येथील लोकनियुक्त सरपंच गिरीश देसले, पोलीस पाटील युवराज माळीआदींनी केले आहे.