धुळे सीए शाखेच्या अध्यक्षपदी अग्रवाल
धुळे (करण ठाकरे) दिल्ली येथील दि इन्स्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागीय धुळे शाखेची वर्ष २०२२-२५ची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. सदर कार्यकारणी मधील सीए निलेश के. अग्रवाल यांची वर्ष २०२२-२०२३ करिता अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणी अशी उपाध्यक्ष रचेंद्र लोकेंद्र मुंदडा, सचिव सागर गर्ग तर खजिनदार म्हणून विशाल शर्मायांची निवड केली. तसेच ‘विकासा’ या विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यश आचलिया यांना दिली. यावेळी व्यवस्थापन समिती ६ सदस्यांची जाहीर केली. सहावे सदस्य म्हणून मालेगाव येथील सीए गोविंदा अग्रवाल असतील. मावळते अध्यक्ष अविनाश घुंडियाल यांनी पदभार हस्तांतर केला. कार्यक्रमास लोकेंद्र मुंदडा, अनिल गुजराथी, जी. बी. मोदी, व्ही. सी. अग्रवाल, जयेश गौड राजाराम कुलकर्णी निलेश अग्रवाल उपस्थित होते.