महाराष्ट्र
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षनिमित्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बोदवड येथे स्वच्छता अभियान
बोदवड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्ष निमित्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बोदवड येथे स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते.
माझी वसुंधरा अभियान अतर्गत दिं. ७ जून ते १३ जून २०२२ कालावधीत. “पर्यावरण जनजागृती ” व “स्वच्छ्ता सप्ताह”आयोजन करावे. त्याच अनुषंगाने औ. प्र. संस्था बोदवड येथे NSS अतर्गत संस्थेचे प्राचार्य टी.आर पाटील, कार्यक्रम अधिकारी ए. ए. साळुंके, (NSS) राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आज दि. १० जून २०२२ रोजी बोदवड बस स्थानक व परिसरातील स्वच्छता केली. त्यावेळी संस्थेतील ए.बी. साळवे, के. जे सोनवणे, एस ए पाटील, वाय एस सावरीपगार तसेच पतंगे, एस. एस उगले आदी कर्मचारी व एसटी बस स्थानक आगार प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाअंती परीवहन विभागातील अधिकारी यांनी संस्थेचे आभार मानले.