महाराष्ट्र
दहिगांव (संत) ते सामनेर रस्ताच्या कामाला सुरुवात ; प्रतिभाताई पवार यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन
पाचोरा (धनराज भोई) बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दहिगांव (संत) ते सामनेर रस्ताच्या कामाला आज पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आमदार किशोरअप्पा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातुन सदर कामाची सुरवात प्रतिभाताई पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आले.
यावेळी सरपंच सुनीताताई मोरे, उपसरपंच बालासाहेब पाटील, माजी सैनिक वसंत कोळी उपस्थित होते. सदर रस्ताचे काम एल.एच.पाटील कंट्रक्शन कंपनी करत असून सदर कामाला सुरवात झाल्यामुळे परिसरातील नागरिकांची ह्या रस्तामुळे सोय होणार आहे. यामुळे दहिगांव (संत) ते सामनेर ह्या प्रवासाचे अंतर देखील कमी होणार असून ह्या रस्तामुळे ही दोघे गावे बारमाही जुळणार आहे. सदर कामामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.