शिंदखेडा येथील श्री जी अभ्यासिकेचा विद्यार्थी मुबंई पोलीस भरती झालेल्या राजेंद्र देसले व पत्रकार बांधवांचा सन्मान
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिदंखेडा येथील श्री जी अभ्यासिकेचा विद्यार्थी नुकतिच मुबंई येथील पोलीस भरतीत राजेंद्र देसले यांची निवड झाली. यांचा सत्कार शिदंखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पि आय सुनील भाबड साहेब याच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी अभ्यासिकेचे, अध्यक्ष नगरसेवक सुनील चौधरी, शहरातील पत्रकार बंधू, विद्यार्थी, व अभ्यासिकेचे संचालक, सताळीस आबा, दिपक चौधरी, भरत बोरसे, माजी सैनिक, व मित्र परिवार उपस्थित होते.
श्री जी अभ्यासिकेत पत्रकार दिनानिमित्त सत्कार
शिदखेडा येथील श्री जी अभ्यासिकेचे अध्यक्ष, नगरसेवक तथा विरोधीपक्ष नेते सुनील चौधरी यांनी पत्रकाराचा सत्कार केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प,स,सभापती,भाऊसाहेब सुरेश देसले , प्रमुख पाहुणे, शिदंखेडा पोलीस निरीक्षक पि आय सुनील भाबड व माजी सैनिक, उपस्थित होते.
प्रदीप दिक्षित, दिपक माळी, जी.पी.शास्री, भिका पाटील, जितेंद्र मेखे, परेश शहा, सतिष पाटील, अशोक गिरनार, विनायक पवार, विजयसिंह गिरासे, संजय महाजन , यादवराव सावंत, या सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला,
आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबई येथे 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या कार्यामुळे मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. आज या घटनेस 190 वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या या महत कार्याची आठवण आपणास रहावी म्हणून प्रतिवर्षी 6 जानेवारी रोजी राज्यात पत्रकार दिन साजरा केला जातो. आपले गावातिल पत्रकार बंधू आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त, समाजातील उपेक्षित वर्गाला न्याय देणारे पत्रकार दिनानिमित्त सन्मान करण्यात आला.