जनता हायस्कूलमध्ये 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात
शिंदखेडा (यादवराव सावंत) केंद्र शासनाच्या आदेशान्वये सर्व पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांचे जनता हायस्कूल व कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा येथे कोविड लसीकरण करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव तथा आरोग्य सभापती मीरा मनोहर पाटील तसेच ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा येथील डॉ. के डी ओतरी, डॉ. पंकज चौधरी, डॉ. शुभम तेलंग, डॉ. रोहित पवार तसेच आरोग्य सेविका आखडमल, यास्मिन शहा, मीना बडगुजर, आशा पाटोळे, सुशीला माळी, प्राचार्य एम डी बोरसे, पर्यवेक्षक उमेश देसले, ज्येष्ठ शिक्षिका एस एस बैसाणे आदी मान्यवर उपस्थित होते. लसीकरण करण्यास आलेले सर्व डॉक्टर व आरोग्य सेविकांचे भारतीय संस्कृतीप्रमाणे हळदी कुंकवाचे औक्षणं करून व मराठमोळ्या नऊवारी साडी वेशभूषा परिधान करून शाळेच्या विद्यार्थिनींनी कडून गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला शाळेतून एकूण 460 विद्यार्थी लसीकरनास उपस्थित होते कोविड आजाराच्या विरोधात लढण्यासाठी लसीकरण असल्याने विद्यार्थ्यांनी उत्साहात लसीकरणात सहभाग घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस ए पाटील तर मान्यवरांचे आभार ए टी पाटील यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर बंधू-भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.