आईच्या वाढदिवसानिमित्त एनईएस गर्ल्स हायस्कुलमध्ये पुस्तके, वह्या, पेन आणि चॉकलेट वाटप ; जयश्री दाभाडेंचा शैक्षणिक उपक्रम
पारोळा (प्रतिनिधी) अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या, वरिष्ठ महाविद्यालयाच्या व्याख्याता, पत्रकार प्रा जयश्री दाभाडे या आपल्या घरातील सर्वांचे वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरे करतात. आज त्यांनी आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त पारोळा येथील एन इ एस गर्ल्स हायस्कूल मध्ये इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थिनींना मुलगी वयात येताना, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ अशी १०० पुस्तके, १०० वह्या, चॉकलेट आणि पेन असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
आईला वाचनाची खूप आवड आहे. त्या अनुषंगाने वाचन संस्कृती टिकावी..हल्ली मुलांच वाचन खूप कमी झालं आहे. त्याच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच मुलींना वयात येताना निर्माण होणारे प्रश्न सुटावे, सावूच्या कार्याची ओळख व्हावी, जिजाऊ प्रमाणे शिवबा घडविण्यात त्या सक्षम व्हाव्यात आणि अन्यायाच्या विराधात लेखणी सतत कार्यरत व्हावी ह्या उद्देशाने वरील सर्व साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यांच्या आई ह्या न प प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. वेगवेगळे उपक्रम राबविणे, सांस्कृतिक कार्यक्रम तयार करणे, सामाजिक क्षेत्रात त्या कार्यरत होत्या. अनेक प्रश्न त्यांनी त्यावेळी यशस्वीरित्या हाताळले. उत्तम कवीयत्री, अगदी तात्काळ सुंदर कविता रचण्यात हाथखंडा होता, अनेक गटसंमेलने, कार्यक्रमांचे सूत्रसंचालन उत्तम रीतीने पार पाडत असे. त्यावेळी शिक्षिका असूनही महिला कमी प्रमाणात व्यासपीठावर येऊन बोलत असत पण मात्र प्रत्येक कार्यक्रमात भाषण करत असे. एकदम निडर, स्वच्छ,प्रामाणिक व्यक्तिमत्व असा आईचा ठसा होता. तोच वारसा घेऊन प्रा जयश्री दाभाडे आणि त्यांची भावंडे कार्य करत आहेत.
आईमुळे वाचनाचा छंद जडला आणि तो आजही जोपासत आहे. त्यासाठी तरुणांमध्ये वाचन संस्कृती जोपासली जावी, मूले मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांकडे अधिक वळले आहेत. त्यांनी पुस्तके वाचावीत, ज्ञानाची शिदोरी जपावी, पुस्तकांसारखा दुसरा गुरु, किंवा मित्र दुसरा नाही याची जाणीव तरुण मुलींना व्हावी ह्या उद्देशाने पुस्तकांचे वाटप करण्यात आले. आई खूप खूप दीर्घायुष्य तुला लाभो..असेच निरोगी आयुष्य तू अजून खूप वर्षे जगावे कारण मला अजूनही तुझी खूप गरज आहे. आज अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून ठगुबाई सोनवणे दाभाडे यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.