चोपडा (विश्वास वाडे) येथील भगिनी मंडळ संचलित ललित कला केंद्र व इनरव्हील क्लब ऑफ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने पतंग रंगवा व सजावट स्पर्धा उल्हसित भावनेने संपन्न झाली. या स्पर्धेत चोपडा शहरातील १० माध्यमिक शाळातील इ.८वी,९वी तील कला छंद जोपासणाऱ्या ९० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या स्पर्धेसाठी भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे हा विषय दिलेला होता.
या स्पर्धेत चैताली परेश चित्ते (विवेकानंद विद्यालय) हिस प्रथम, उमेश चौधरी (प्रताप विद्यामंदिर) यास द्वितीय, कांचन शरद शंभरकर (कस्तुरबा माध्यमिक विद्यालय) हीस तृतीय, खुशी संजय चव्हाण (महिला मंडळ माध्यमिक स्कूल) हीस चतुर्थ, सिएरा कौसर शेख जहांगीर (मुस्तफा ॲंग्लो उर्दू स्कूल) हीस पाचव्या क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले. त्यांना रोख रक्कम, आकर्षक स्मृतिचिन्ह व देखणे प्रमाणपत्र इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट ३०३च्या चेअरमन अश्विनी प्रसन्नलाल गुजराथी, अध्यक्षा पूनम आशिषलाल गुजराथी, सचिव मीना महेश पोद्दार, आय एस ओ सोनल शाह, अंजली अनंत देशमुख, सुनंदा अनिल महाजन इ.मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान केली गेली.
याप्रसंगी मुस्तफा उर्दू स्कूलचे मुख्याध्यापक सय्यद रफिक, महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.डी. चौधरी, जिल्हा कला शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दिनेश बाविस्कर, ज्येष्ठ कलाशिक्षक व्ही.डी. पाटील, कलाशिक्षक पंकज नागपुरे, कलाशिक्षक राकेश विसपुते, कलाशिक्षक एम.पी. पाटील उपस्थित होते. स्पर्धा प्रमुख म्हणून प्रा. संजय नेवे, परीक्षक म्हणून प्रा.सुनिल बारी प्रा. विनोद पाटील यांनी काम बघितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी अतुल अडावदकर, प्रवीण मानकरी, सोनू वैद्य, प्रणव मुंडले, निखिल पाटील, भुपेंद्र महाजन, मयूर राजपूत, देवेन बारी, योगेश जुनारे यांनी परिश्रम घेतले.