महाराष्ट्र
निळगव्हाणचे सरपंच प्रा. मुकेश किशोर पाटील यांना आदर्श सरपंच सेवारत्न गुणगौरव पुरस्कार
निळगव्हाण (प्रतिनिधी) मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेमार्फत २०२१ गुणीजन गौरव पुरस्कार वितरण समारंभ नुकताच नाशिक येथे ह. भ. प. श्याम सुंदर महाराज आळंदीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व सुप्रसिद्ध साहित्यिक रमेश आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली वितरित करण्यात आला. यात निळगव्हाणचे सरपंच प्रा. मुकेश किशोर पाटील यांना आदर्श सरपंच सेवारत्न गुणगौरव पुरस्कार देण्यात आला.
प्रा मुकेश किशोर पाटील यांना कोविड -१९ महामारी च्या काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल संस्थेने घेऊन यांना हा पुरस्कार देण्यात आला. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल विशाल खानदेशचे नेते माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीण आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील व निळगव्हाण ग्रामस्थांच्या वतीने कौतुक करण्यात आले.