ब्रेकिंग
पाचोरा येथील एस. एस.महाविद्यालयातील सभागृहात घेण्यात आला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा कार्यक्रम
पाचोरा (प्रतिनिधी) डॉ भूषण मगर-पाटील फाउंडेशन आयोजित आज एस. एस.महाविद्यालय पाचोरा येथील सभागृहात ‘संवाद तरुणाईशी, वेध भविष्याचा’ या विषयावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाचोरा येथील प्राताधिकारी विक्रम बांदल, विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भूषणदादा मगर, जळगाव येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अनिलचंद्र सुर्वे, प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.वासुदेव वले उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.माणिक पाटील तर आभार प्रदर्शन भोसले यांनी मानले.