शिंदखेडा येथील वरपाडे रोड लगत असलेल्या भुमिगत गटार नादुरुस्त झाल्याने अपघाताला निमंत्रण ; रहिवाशांचा उद्रेक, नगरपंचायतचा गलथान कारभार
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील वरपाडे रोडवरील शिवाजी चौफुलीवरुन पोलिस स्टेशन ला भुमिगत गटार गेली असुन सदरील गटारीचे ढापे उखडून गेल्याने पायी चालत किंवा दुचाकी वाहन चालक येथे जावुन आदळतात. म्हणुन रहिवासी ना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.परिणामी गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटना घडल्या आहे म्हणून नगरपंचायत यांचा गलथान कारभारामुळे पुन्हा वाद चौव्हाटयावर आला असून त्वरीत दुरुस्ती करण्याची मागणी येथील संत्तप्त रहिवासीनी केली आहे.
ह्यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष देसले, तालुका प्रवत्ते प्रा.प्रदिप दिक्षीत, समन्वयक विनायक पवार, पीक संरक्षण सोसायटीचे चेअरमन नाना चौधरी, शहरसंघटक संजय पहाडी,उपशहरप्रमुख भैय्या परदेशी,दरबारसिंग गिरासे, विभाग प्रमुख शाम सोनवणे, भास्कर कसबे, सुकदेव सोनवणे, गणपत कृष्णा देसले, सुरेश कसबे, रंजना बडगुजर, मंगलाताई चौधरी,रजुबाई चौधरी, सखुबाई कोळी, उषाबाई मराठे यासह रहिवासी असलेल्या नागरिकांनी उद्रेक केला.दोन दिवसात सदरील भुमिगत गटार चे ढापे पुन्हा दुरुस्ती करून बसविण्यात यावेत अन्यथा शिवसेना स्टाईलने तिव्र स्वरुपात आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष देसले यासह पदाधिकारी यांनी नगरपंचायतला दिला आहे.