शिंदखेडा नगरपंचायत येथे भाजपतर्फे अरुण देसले, काँग्रेसचे अशोक बोरसे यांची स्विकृत नगरसेवक बिनविरोध निवड
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील नगरपंचायत च्या सभागृहात आयोजित सकाळी 10 वाजता स्विकृत नगरसेवक यांची निवड प्रक्रिया पिठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष रजनीताई अनिल वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात भाजपतर्फे अरुण भिकनराव देसले तर काँग्रेसचे अशोक पिंताबर बोरसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
झालेल्या निवड प्रक्रियेत नगराध्यक्ष रजनीताई अनिल वानखेडे, गटनेते अनिल लालचंद वानखेडे, उपनराध्यक्ष भिला बारकु पाटील, विरोधी पक्षनेते सुनील बाजीराव चौधरी, नगरसेवक प्रकाश नागो देसले, किसन जगन सकट, योगिता विनोद पाटील, निर्मला युवराज माळी ,नर्मदा अर्जुन भिल . दिपक दशरथ अहिरे, उदय अरुण देसले, संगीता किरण थोरात, भारती जितेंद्र जाधव, वंदना चेतन परमार आदी नगरसेवक उपस्थित होते. सदर निवड प्रक्रियेत मुख्याधिकारी प्रशांत बिडगर , प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे, सहायक विवेक डांगरीकर यांनी सहकार्य केले. निवड झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून डिजेच्या तालावर जल्लोषात स्वागत शहरातून करण्यात आला. भाजपतर्फे गटनेते अनिल वानखेडे, शहराध्यक्ष प्रविण माळी, युवराज माळी, अॅड.विनोद पाटील, जितेंद्र जाधव, प्रकाश देसले, चेतन परमार यासह प्रा.सतिष पाटील, गणेश मराठे, रउफ बागवान, न्हानभाऊ पाटोळे, सुनील बडगुजर. निलेश परदेशी, नाना मिस्तरी . दादा भोई, सुरेश मिस्तरी, पंकज कौठळकर, चेतन देसले, भुषण देसले , अनिल पवार, रोहित देसले, आनंद देसले, रेहान बागवान, नवीद तंबोली नाजीम मिस्तरी, प्रवीण बैसाणे अक्षय पाटोळे यासह कार्यकर्ते यांनी जल्लोषात स्वागत व सत्कार केला. तसेच काँग्रेसचे माजी सभापती प्रा.सुरेश देसले , माजी नगराध्यक्ष दिपक देसले , विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, नगरसेवक दीपक अहिरे, उदय देसले, किरण थोरात, चंद्रकांत सोनवणे, अनिल बोरसे, छगन पाटोळे, दिपक मंगळे, पप्पू अहिरे, चंद्रकांत पाटोळे, सनी बोरसे, जितू नगराळे , विशाल पाटोळे, गणेश थाटशिंगार, भरत बोरसे, दादा न्हायदे, लोटन बोरसे, राहुल कढरे, संतोष बिराडे , संदीप पाटोळे यांसह मित्र मंडळ व कार्यकर्ते यांनी डिजेवर जल्लोषात स्वागत व सत्कार करण्यात आले.