महाराष्ट्र

संतश्री सिदाजीआप्पा जयंतीनिमित्त नंदनगरीत प्रतिमापूजन

नंदुरबार (प्रतिनिधी) वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे आराध्य दैवत परम पूज्य संतश्री बालब्रह्मचारी सिदाजीआप्पा देवर्षी यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त नंदनगरीत बालवीर चौकात प्रतिमा पूजन, आरती, प्रसाद वाटप आदी धार्मिक उपक्रम करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या नंदुरबार शाखेतर्फे आयोजित संतश्री सिदाजी आप्पा देवर्षी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन गवळी समाजाचे ज्येष्ठ नागरिक शतकवीर भीमाजी यादबोले यांच्या हस्ते करण्यात आले. तर सिदाजी आप्पांची आरती सेवानिवृत्त प्राचार्य देमाजी लगडे यांनी केली. गवळी समाजाची ओळख असलेले भस्म (ईबीत) प्रत्येकाच्या कपाळी लावण्यात आले. शंख निनाद करीत आरती नंतर उपस्थित समाज बांधवांना प्रसाद वाटप करण्यात आले. याप्रसंगी देमाजी लगडे यांनी संतश्री सिदाजी आप्पा देवर्षी यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. तसेच गवळी समाजातील युवकांनी मांसाहार व मद्यसेवना पासून लांब राहण्याचे आवाहन केले.

प्रतिमापूजन कार्यक्रमास प्रकाश घुगरे, राजेंद्र लगडे, हेमंत नागापुरे, आनंदा घुगरे, सुशील गोडळकर, पिरन लगडे, हेमराज लगडे, प्रा. एकनाथ हिरणवाळे, पांडुरंग यादबोले, विशाल हिरणवाळे, प्रशांत गवळी, ईश्वर घुगरे तसेच हिमांशू गवळी, प्रणव गेनाप्पा, नंदू गवळी, प्रथम गवळी, साई गवळी आदीसह सर्व समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे जिल्हाध्यक्ष गोपाल लगडे, जिल्हा कार्याध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे