उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन
सिल्लोड (विवेक महाजन) युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार (दि.19) रोजी शहर व तालुक्यात विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजित शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा असे अवाहन शिवसेना, युवासेना व अब्दुल समीर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांचा वाढदिवस दरवर्षी सामाजिक उपक्रमाने साजरा केला जातो. सालाबादप्रमाणे याही वर्षी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत डॉ. निलेश मिरकर यांच्यावतीने शहरातील सुमन हॉस्पिटल येथे सकाळी ९ वाजेपासून मोफत बॉडी चेकअप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता प्रियदर्शनी चौकात डीलक्स मेडिकल येथे नगरसेवक मनोज झंवर मित्र मंडळाच्यावतीने मोफत मधुमेह तपासणी, उपचार व लाडूतुला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता शिवसेना, युवासेनेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात येणार आहे. त्यासोबत सकाळी १० वाजल्यापासून डॉ. खंडेलवाल यांच्या वतीने खंडेलवाल हॉस्पिटलमध्ये मोफत मेंदू रोग, अर्धांगवायू, फिट्स, नसांचे विकार, हृदयरोग, श्वसन विकास, डायबिटीस निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन तसेच युवा व्यापारी प्रतिष्ठानच्या वतीने लाडूतुला, त्यानंतर शहरात विविध ठिकाणी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र मंडळाच्या सदस्यांनी उपस्थित रहावे तसेच विविध ठिकाणी आयोजित आरोग्य विषयक शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आयोजकां च्यावतीने करण्यात आले आहेत.