चहा पित नाही तेवढ्यात-तंदुरी चहा हाँटेलवर लावलेली मोटरसायकल दिवसाढवळ्या लंपास
घर-दुकानापुढे नवीन-अनोळखी व संशयित व्यक्ती वाटल्यास पोलीसांना कळवा-कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांचे आवाहन
दोंडाईचा (प्रतिनिधी) गावात पुन्हा नेहमी रहदारीने गजबजलेल्या असलेल्या निर्मल एम्पोरियम समोर तंदुरी चहा हाँटेल दुकान समोर लावलेली भादवड येथील तरूणाची अठरा महिने वापरलेली नवी हिरो कंपनीची स्पेल्डंर प्रो. मोटरसायकल दिवसाढवळ्या चोरी झाली आहे. सध्या गावात एखाद दिवसाआड घर- दुकानापुढे लावलेल्या मोटरसायकली व इतर साहित्य चोरी होत असल्यामुळे दैनंदिन चौरांची चोरी करायची हिमंत पाहून नागरिक हैराण झाले आहेत. म्हणून दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी जनतेला आपल्या घर व दुकानापुढे संशयित वाटल्यास त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत. पोलीसांना माहिती कळवायचे आवाहन केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नात्यागोत्यातील लग्न कार्यसाठी पुणे येथून आलेला पण मुळ गाव भादवड ता. नंदुरबार येथील रहिवासी भुषण गुलाब शिंदे (वय-२५) हा खरेदी निमित्त दोंडाईचा येथे आला असता. गावात चांगली चहा प्यावी व शर्टाला प्रेस मारण्याच्या हेतुने निर्मल ऐम्पोरियम समोरील तंदुरी चहा हाँटेलवर मोटरसायकल लावत बाजूच्या केवल लाँन्ड्री येथे शर्ट प्रेसला दिले. त्याठिकाणी चहा पित नाही तेवढ्यात आठ ते दहा फुटावर लावलेली हिरो कंपनीची स्पेंल्डर प्रो. गाडी क्रमांक एम्.एच. १४-जे.एल.-२९३३ क्षणात अनोळखी चोराने शिताफीने लंपास केली. तिचा इतरत्र शोध घेतला परंतु मिळून आली नाही. मात्र शेजारील मानसी कलेक्शन मधील सीसीटीव्ही कँमेरात चोरटा नजरबंद झाला आहे. याबाबत दोंडाईचा पोलीस स्टेशनला गाडी चोरीची खबर देत सीसीटीव्ही फुटेज जमा करण्यात आले आहेत.
सध्या गावात लाँकडाऊन नंतर बाजारपेठा उघडल्यावर गाव व परिसरात जिकडे पहावे तिकडे मोटरसायकल चार-चाकी गाडी व इतर साहित्य रात्री-अपरात्री, दिवसाढवळ्या घर व दुकानापुढून चोरीला जाण्याचा घटना घडत आहे. म्हणून लाँकडाऊन मधून निघालेल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या मोटरसायकल सह इतर साहित्यांची जाण व गरज-महत्त्व आहे. मात्र ते मोटरसायकल-साहित्य जेव्हा नजर हटल्यावर क्षणात चोरले जात असल्याने नागरिक हैरान होऊन जात आहे व आपलीच वस्तु वरून तीला शोधायला लागणारी यंत्रणा पाहून नागरिक अस्वस्थ होत आहे. एकीकडे चोरांची ऐवढी हिमंत पाहून नागरिक मध्यस्थी मार्फत आपलीच वस्तू मिळवण्यासाठी जीवउत्कुंठा करत वेळप्रसंगी तिची किमंत मोजत वस्तु परत मिळवण्याची शक्कल-अक्कल लढवत आहे. त्यात काहींना यश ही आले. पण हा काही या घटना रोखण्याचा मार्ग नाही. म्हणून दोंडाईचा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक यांच्या कानावर जसा हा प्रकार कळाला. तसे त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जो पर्यंत आपण तक्रार देत, आपल्या पर्यंत आलेली चोराची माहिती देत नाही. तो पर्यंत आम्ही चोरांच्या साखळीचा मुसक्या आवळू शकत नाही. म्हणून आपण आपल्या घर व दुकानापुढे संशयित वाटल्यास त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवत पोलीसांना तातडीने संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन केले आहे.