महाराष्ट्रराजकीय

पंतप्रधान मोदींकडून राज्याबाबत भेदभाव होतोय ; खडसेंचा आरोप

खडसेंविरोधात ईडीकडून हजार पाणी आरोपपत्र दाखल

मुक्ताईनगर (सचिन झनके) (शैलेश गुरचळ) काँग्रेसने कोरोनात मजुरांना तिकीटं देऊन कोरोना पसरवल्याचा थेट आरोप राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. पंतप्रधान मोदींच्या या आरोपावरून राज्यातल्या महाविकास आघाडीतील नेत्यांनी मोदींवर आणि भाजपवर टीकेची झोड उडवली आहे. त्यातच मोदींच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीही खोचक टोला लगावला आहे.

प्रंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात राजकीय दुजाभाव दिसतो. देशाला दिशा न दाखवता 60 मिनिटांच्या भाषणात 50 मिनिटं फक्त काँग्रेसवर टीका त्यांनी केली. हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडून राज्याबाबत भेदभाव होत आहे, असा आरोप खडसेंनी केला आहे. महाराष्ट्रामुळे कोरोना वाढला हे मोदीजीं चे वक्तव्य म्हणजे खेदाची बाब आहे. पाकिस्तानमधून अतिरेकी येत आहेत ते थांबले नाहीत मोदींना असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच मागच्यावेळी गोवा निवडणुकीचे चित्र वेगळे होते. गोव्यात इतर पक्षाच्या कुबड्या घेऊन भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी काम करत होता. यावेळेस इतर पक्षाचा जोर गोव्यात जास्त आहे. भाजप विषयी नाराजी आहे. उत्पल पर्रीकरांनना तिकीट त्याचा निवडणुकीवर निश्चित परिणाम होईल, असे भाकितही खडसेंनी केले आहे. गोव्यात सध्या भाजप पुन्हा सत्तेत येण्यासाठी जोर लावत आहे. आजच जाहीरनाम्यात भाजपने मोठ्या घोषणांचा पाऊस पाडला आहे. त्यामुळे खडसेंचा हा अंदाज किती खरा ठरतो? हे निकालानंतरच कळेल.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे