जमाअत ए इस्लाम हिंदच्या वतीने मोताळा तहसीलदार यांना निवेदन !
मोताळा (मिलींद बोदडे) महाराष्ट्र सरकार ने सुपर मार्कटमध्ये वाईन विक्री करण्याचा समाजविघातक निर्णय घेतला आहे. वाईन हि दारु नसुन आरोग्यदायी पेय आहे असा प्रचार प्रसार सरकार मधील जबाबदार लोक करीत आहे. अश्या परिस्थीतीत वाईन ला दारु समजने चुकीचे आहे.
वाईन हि दारु आहे, याची जाणीव सरकारला आहे म्हणूनच ती आजपावेतो दारुच्या दुकानात विक्री होते. प्रत्येक दारुच्या दुकानात वाईन उपलब्ध असते. अश्याच सुपरमार्कट मधुन वाईन विक्री करण्याची गरज सहाजीकच जास्तीचा महसुल गोळा करण्याशिवाय असुच शकत नाही. औंरगाबादचे प्रा डाँ ऋषिकेश खाडीलकर यांच्या मते गेल्या दहा ते पंधरा टक्यांनी व्यसनाधिनता वाढली आहे. दरवर्षी आपला देश १८ हजार ५०० कोटीची क्रयशक्ती गमावत आहे. त्यात पुन्हा माँल सारख्या वर्दळीच्या ठिकाणी आर्कषाद वाईनचे कांउटर उघडले गेले तर ईच्छा नसलेल्या लोकांची सुध्दा वाईन खरेदी करण्याची ईच्छा होईल. यातुन व्यसनाधिनता वाढल्याशिवाय राहणार नाही हा निर्णय सरकार ने घेतला हा अतिषय निर्दयी आहे. सरकारने काढलेला अध्यादेश ताक्ताळ मागे घ्यावा, असे निवेदन जमाअत ए इस्लाम हिंद च्या कार्यकर्त यानी दिले. निवेदन देण्यासाठी उपस्थीत मोहम्मद हनीफ मिल्ली, जामा मज्जीद इमाम, मुकीम खान, अबरार खान, कलाम चाँद, मिया पटेल, अ हमीद अ समद, डाँ रउफ शेख, शेश शफिक शेख बशीर, अँडव्होकेट एम वाय पठाण, मोताळा येथील जमाअतएइस्लाम हिंद चे कार्यकर्त उपस्थित होते.