महाराष्ट्र

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा वरवाडे नगरपालिका नगरसेवक व नेत्यांशिवाय-मागील सत्तर दिवसांपासून चालतेय नगरपालीका

प्रशासक पुर्ण करतेय जनतेच्या मुलभूत गरजा

शिंदखेडा (यादवराव सावंत) तालुक्यातील दोंडाईचा-वरवाडे नगरपालीकेत तत्कालीन सत्ताधारी गटाचा कार्यकाळ नुकताच मागील सत्तर दिवसापुर्वी म्हणजे २६ डिसेंबर २०२१ रोजी संपुष्टात आला असुन, तेव्हापासुन ना नगरसेवक, ना नेत्यांशिवाय गावाचा कारभार प्रशासकीय अधिकारी म्हणून अप्पर तहसीलदार सुदाम महाजन व त्यांच्या जोडीला मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम फस्टक्लास पाहत आहे.

२८ डिसेंबर २०२१ पासुन म्हणजे ह्या सत्तर दिवसाच्या काळात जनतेच्या ज्याही काही मुलभुत गरजा जसे सार्वजनिक रस्ते, पथदिवे, आरोग्य, सांडपाण्याची दैनंदिन साफसफाई, पिण्याच्या पाणी, दररोज कचरा गोळा करणारी घंटा गाडी आदी सुविधा प्रशासकीय अधिकारी तथा अप्पर तहसीलदार सुदाम महाजन व मुख्याधिकारी डाॅ.प्रविण निकम यांच्या कार्यशैलीत पुर्ण केल्या जात आहे. तसेच त्यांच्या जोडीला कर्मचारी वर्गही दैनंदिन पालिकेत आलेल्या माहिती अधिकार- तक्रारी वजा जन्म-मुत्यू दाखलासह इतरही जनतेच्या कांमाना तात्काळ न्याय देत, मालमत्ता कर वसुलीचेही उद्दिष्ट प्रामाणिकपणे साधत आहे.

अनेकांना नगरसेवक बनायची अजुनही हाव, तर जनता विसरत चालली यांचे घाव

तसेच दोंडाईचा-वरवाडे नगरपालीकेची सार्वत्रिक निवडणूक पुढे ढकलली गेल्याने अनेक इच्छुक व तत्कालीन नगरसेवक ज्यांना पुन्हा जनतेचे सेवक बनायची इच्छा आहे. त्यांचा मात्र सत्ता-पावर गेल्यामुळे धीर सुटत चालला आहे. कारण सत्ता व नगरसेवक पद गेल्यामुळे कोणी इतुलस्या कामालाही विचारत नसल्यामुळे आपला मान-सन्मान परत मिळवण्यासाठी प्रत्येक भावी नगरसेवक व तत्कालीन म्हणजे ज्यांची पुन्हा नगरसेवक बनायची इच्छा आहे. ती मंडळी चौका-चौकात, वार्डात, गावात-चहाच्या टपऱ्यांवर आपले व आपल्या नेत्यांच्या विकासाचे गुणगान गात,परत मला व माझ्या नेत्याला-पक्षाला निवडून द्या, असे अप्रत्यक्ष प्रचार करत जनतेच्या मनावर बिबंवत आहे. मात्र जनताही यांचे काम करायचे घाव विसरली नसुन, मागील सत्तर दिवसापासुन यांच्या भुल-थापांना बळी न पळता, यांच्या मागेमागे न फिरता.आपल्या अडलेल्या-रेगांळलेल्या कामांना प्रशासकाकडून दोन शब्द खर्च करून, गोडीगुलाबीने करवून घेत,मोकळा श्वास घेत आहे. म्हणून गावात कोणत्याही नागरिकाला कोणी विचारले की,गाव-नगरपालीका नगरसेवक-नेत्यांशिवाय कशी चालली आहे. तर कोणीही हसुन, चांगलीच चालली असल्याचे सत्तर दिवसात उत्तर देत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे