शिंदखेडा शहर आज कडकडीत बंद सर्व पक्षीय पाठिंबा ; शहरातील भुषण पाटील यांच्यावर झालेला हल्ला प्रकरण निषेधार्थ
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा शहरातील कधी ना कधी घडत असलेल्या विविध चोरी चपाटी, महिलांवर अत्याचार, मोटर सायकल चोरी, दिवसाढवळ्या चाकु हल्ले असे असंख्य प्रकार समोर येत असताना पोलीस स्टेशन मात्र हयात अनभिन्न असल्याने शहरात अशा चोरांचा व गुंडागर्दी करणाऱ्या व्यक्तींचा धुमाकूळ जास्त माजलेला आहे.
या पार्श्वभूमीवर नुकत्याच दहा-बारा दिवसापूर्वी शिवाजी चौफुलीवर वरपाडे रोड येथे भूषण जयवंतराव पाटील यांच्यावर रात्री साडे दहाच्या सुमारास चाकू हल्ला झाला होता सदर चाकु हल्यात गंभीर रित्या जखमी झाल्याने त्यास त्वरित रुग्णालयात दाखल केले होते मात्र तरीदेखील सदरील चाकू हल्यावर कोणत्याही प्रकारची बारा ते तेरा दिवस उलटूनही प्रकारची कारवाई शिंदखेडा पोलिस स्टेशन मार्फत चौकशी अथवा त्यांना ताब्यात घेण्यात अपयशी ठरले आहेत त्यानंतर धुळे येथील पोलिस अधीक्षक यांना देखील शिंदखेडा शहरातील सर्व पक्षांनी, व्यापारी असोसिएशन पदाधिकाऱ्यांनी समक्ष निवेदन देऊन देखील अद्याप हल्लेखोरांवर कारवाई झालेली दिसून येत नाही म्हणून संतप्त शिंदखेडा शहरातील नागरिकांनी आज या निषेधार्थ शिंदखेडा शहर कडकडीत बंद पाडण्यात यशस्वी होऊन शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्यानुसार शहरातील भगवा चौक, शिवाजी चौक ,गांधी चौक,हॅडल चौक अशा मुख्य मार्गावरून शहरातील सर्व, पक्षांनी पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन मोर्चा चे स्वरूप दाखवून निषेध व्यक्त केला सदरील हल्लेखोर यांच्यावर कारवाई व्हावी व त्वरित अटकेची मागणी पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांना घेराव घालत पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसात कार्यवाही न झाल्यास शहरासह जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
ह्यावेळी जयवंतराव पाटील, नगरपंचायत विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, नगरसेवक उदय देसले, अरुण देसले दीपक अहिरे, अशोक बोरसे, व्यापारी अशोसिएनचे बाळकृष्ण बोरसे, मोहन परदेशी, संजय पाटील, शिवसेना शहरप्रमुख संतोष देसले, तालुका समन्वयक विनायक पवार, विधानसभा क्षेत्र प्रमुख गणेश परदेशी, नंदकिशोर पाटील, पिक संरक्षण सोसायटीचे चेअरमन नाना चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण पाटील,गोलु देसले, चेतन देसले, निलेश देसले, गजेंद्र गिरासे, प्रकाश पाटील, विशाल वाघ, तुषार देसले, चेतन भामरे,कुणाल गुरव, नितीन गुरव, यांसह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.